Shirdi Sai Baba | ((Photo Credit: sai.org)

दसरा (Dasara) आणि साईबाबा पुण्यतिथीच्या पार्श्वभुमिवर साई भक्तांसाठी मोठी खुशखबर आहे. साईबाबा संस्थानाचा साईच्या दर्शनासाठी शिर्डी (Shirdi) साई मंदिर (Sai Mandir) भक्तांसाठी आज रात्रभर खुले असणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दसरा (Dasara) आणि साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे तरी भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता साई संस्थांकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यत आला आहे. दोन वर्षानंतर कोरोना (Corna) निर्बंध शिथिल झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात आज चार दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. देश- विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केली आहे. दसरा सण आणि पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून साई नामाचा जयघोष करत भाविक प्रसन्न वातावरणात साईबाबांचे दर्शन घेत आहेत.

 

चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने साई चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे. भाविकांच्या‌ गर्दीने शिर्डी नगरी फुलून गेली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना दर्शन सुकर व्हावे यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे. पुण्यतिथी उत्सवाला 104 वर्षांची परंपरा असून आज भिक्षा झोळी, आराधना विधी यासह सायंकाळी पाच वाजता ज्या खंडोबा मंदिरात साईबाबा प्रथम नजरेस पडले तिथे  सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. (हे ही वाचा:- Happy Dussehra 2022 Messages: विजयादशमीच्या दिवशी खास मराठी Greetings, Images, Wishes शेअर करून द्या दसऱ्याच्या शुभेच्छा)

 

103 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी आपला देह ठेवला होता त्या द्वारकामाई परिसरात देखील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.  उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरासह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर दर्शन रांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.