![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/7-Dussehra-Messages-380x214.jpg)
देशभरात आश्विन शुद्ध दशमीचा दिवस हा विजयादशमी किंवा दसरा (Dussehra 2022) नावाने साजरा होतो. नवरात्रीच्या उत्सवाची सांगता याच दिवसाने होते. वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो. यंदा उद्या म्हणजे, यंदा 5 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. मान्यतेनुसार, विजयादशमीच्या दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी उत्सव साजरा करतात.
दसऱ्याच्या दिवसाबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आदिमायेच्या विविध शक्तीरुपांनी नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि देवीने दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध केला. श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे. तसेच याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते, असेही सांगितले जाते.
तर अशा या पवित्र दिनानिमित्त, खास मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: दसरा सणाच्या निमित्ताने कुटुंबियांचा हट्ट पुरवण्यासाठी सुवासिनी घेऊ शकतात 'हे' खास उखाणे, वाचा)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/5-Dussehra-Messages.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/6-Dussehra-Messages.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/3-Dussehra-Messages.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/1-Dussehra-Messages.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/2-Dussehra-Messages.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/10/4-Dussehra-Messages.jpg)
दरम्यान, या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. तसेच पाटी-पुस्तके आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात, असे सांगितले जाते. दसरा हे विजयाचे प्रतिक आहे. आपल्यामधील वाईट गोष्टी, राक्षसी वृत्ती, वाईट विचारधारणा, क्रोध, त्रागा, दूषित मन या सर्वांवर विजय मिळवून एक चांगली सुरुवात करण्याची शिकवण हा सण देतो.