मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरूद्ध सांगली मध्ये शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. या वॉरंटनुसार राज ठाकर्एंना 11 जुलै दिवशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. वारंवार गैरहजर राहिल्याचं कारण देत शिराळा न्यायदंडाधिकार्यांनी 28 एप्रिल 2022 दिवशी राज ठाकरे यांच्यासोबत 10 जणांविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याची काल 8 जून दिवशी सुनावणी झाली त्याला राज ठाकरे गैरहजर होते. त्यामुळे कोर्टाने राज ठाकरेंविरूद्ध अजून एक अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.
2008 साली राज ठाकरे यांच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनाच्या प्रकरणात शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं होतं. दरम्यान सध्या राज ठाकारेंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची कोर्टात अनुपस्थिती होती. राज ठाकरेंच्या ऐवजी या सुनावणीला मनसे नेते शिरीष पारकर उपस्थित होते. राज ठाकरेंना जामीन तर मंजूर केला पण अजून एक अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे देखील नक्की वाचा: Raj Thackeray Infected with Coronavirus: राज ठाकरे यांना पुन्हा कोरोना व्हायरस संक्रमित, शस्त्रक्रिया पुढे ढकलली .
कोणत्या प्रकरणी राज ठाकरेंविरूद्ध वॉरंट?
2008 साली रेल्वे भरती मध्ये महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना प्राधान्य मिळावं यासाठी मनसेने आंदोलन पुकारलं होतं. कल्याण कोर्टाने राज ठाकरेंना अटकेची कारवाई केली आणि त्याच्या निषेधार्थ शिराळा मधील शेगडेवाडी गाव मनसे कार्यकर्त्यांनी बंद केले. विनापरवाना बंद पुकारल्याने शिराळा पोलिस स्टेसनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि राज ठाकरे सह 10 मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे.