Close
Advertisement
 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago
Live

Sharad Pawar vs. Ajit Pawar NCP Party Crisis Live News Update: वायबी सेंटर येथून शरद पवार लाईव्ह

महाराष्ट्र टीम लेटेस्टली | Jul 05, 2023 03:50 PM IST
A+
A-
05 Jul, 15:50 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वायबी सेंटर येथून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे भाषण आपण लाईव्ह पाहू शकता.

05 Jul, 15:44 (IST)

बापाला घरी बस म्हणणाऱ्या पोरापेक्षा आम्ही मुली बऱ्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी आता वयाचा आदर करुन घरी बसावे, असे अप्रत्यक्षरित्या मत अजित पवार यांनी नामोल्लेख न करता व्यक्त केले होते. त्याला सुप्रिया सुळे यांन प्रत्युत्तर दिले.

ट्विट

05 Jul, 15:28 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वायबी सेंटर येथून बोलत आहे.. आपण पाहू शकता थेट प्रक्षेपण

05 Jul, 15:13 (IST)

वायबी सेंटर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे बोलत आहेत. त्यांचे भाषण आपण लाईव्ह येथे पाहू शकता.

05 Jul, 14:17 (IST)

मुंबई येथे समर्थकांच्या आयोजित बैठकीत अजित पवार बोलत आहेत. या बैठकीत अजित पवार यांनी भाषणास सुरुवात केली आहे.

05 Jul, 14:04 (IST)

अजित पवार समर्थक गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे भाषण सुरु. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यानंतर पटेल यांचे भाषण सुरु. अजित पवार काय बोलणार याबाबत उत्सुकता.

05 Jul, 13:19 (IST)

Jayant Patil यशवंतराव चव्हाण सेंटर वर दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना ते दिसले आहेत. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली आहे. 

05 Jul, 13:11 (IST)

MET Bandra मध्ये अजित पवार गटाचा मेळावा सुरू  झाला आहे. छगन भुजबळ यांनी प्रास्ताविक सुरू झालं आहे. MET Bandra मध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांचे फळांचा हार देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान छगन भुजबळ यांच्याकडून पक्षात कामं न होत असल्याची, नियुक्त्या होत नसल्याच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात येत आहे.

05 Jul, 11:46 (IST)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल देशमुख वायबी सेंटर येथे पोहोचले आहेत. अनिल देशमुख हे शरद पवार समर्थक आमदार आहेत. आपण शरद पवार साहबांसोबतच असे अनिल देशमुख यांनी जाहीर म्हटलेआहे.

ट्विट

05 Jul, 11:15 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत सत्तेत सभागी झाल्यानंतर आमच्या गटातील लोक नाराज झाले. कारण काही आमच्या नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्याने आमचे सर्व नेते खूश आहेत हे खरे नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवले आहे आणि त्यांना हा प्रश्न सोडवावा लागेल... आम्ही नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आणि आजही आहे. आम्ही शरद पवारांच्या विरोधात आहोत. उद्धव ठाकरेंचा वापर शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून केला होता. उद्धव मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सरकार चालवत होते... आता एकनाथ शिंदे कृतीचा निर्णय घेतील, असे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Load More

शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar vs Ajit Pawar) या संघर्षामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीच्याच नव्हे तर न्यायालयीन लढाईच्याही उंबरठ्यावर उभी आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ही फळी एका बाजूला. तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर अशी नेत्यांची तगडी फळी दुसऱ्या बाजूला, असे चित्र आहे. त्यामुळे आमदार आणि नेत्यांची मोठी गोची झाली असून, विठ्ठला कोणता झेंडा घेऊन हाती, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या बैठका आयजित केल्या आहेत. शरद पवार गटाची बैठक वायबी सेंटर येथे दुपारी 1 वाजता सुरु होत आहे. तर अजित पवार गटाची दुसरी बैठक सकाळी 11 वाजता एमआयटी इन्स्ट्यीट्यूट येथे पार पडत आहे. या बैठका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील घटना-घडामोडींसंदर्भात अद्ययावत तपशील, येथे देत आहोत. अपडेट जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा.



Show Full Article Share Now