महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) एकजुटीने लढेल. त्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढतीच्या मार्गाने आम्हाला जायचे नाही. बंडखोरी टाळण्यावर आमचा अधिक भर राहणार आहे. त्यासाठी आवश्यक सूचना गेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नसताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, ते अर्ज मागे घेतले जाणार आहेत. ज्या ठिकाणी तसे होणार नाही, त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्यात आज एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उमेदवारी मागे घेण्यासाठी संबंधितांना सूचना
उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले की, महाविकासआघाडी सर्व जागांवर एकास एकच उमेदवार देणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी मित्रपक्षाकडून दुसरा उमेदवार उभा केला जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्या सर्वांना ते मागे घेण्याबाबत सूचना गेल्या आहेत. अजूनही त्या सूचना सुरुच आहेत. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस पक्षांच्या यंत्रणा त्या सूचना देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले आहेत. ज्या ठिकाणी ते कायम आहेत. त्यांना संबंधिकांकडून सूचना दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Assembly Elections 2024: बंडखोर पक्षादेश पाळणार? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस)
रश्मी शुक्ला यांच्यावरील कारवाईचे स्वागत
उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान बोलतान शरद पवार यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर निवडणूक आगोगाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, महाविकासआगाडीच्या नेत्यांकडून अनेक ठिकाणी दाखल झालेले उमेदवारी अर्ज अद्यापही कायम आहेत. त्यामुळे काही जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार का? याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरु आहेत. याबाबत विचारले असता, मैत्रिपूर्ण लढत करण्याच्या वाटेने जाण्याची आमची आजीबात इच्छा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, DGP Rashmi Shukla Transferred: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाचे आदेश)
मविआची संयुक्त पत्रकार परिषद
Mumbai: On EC ordering transfer of Maharashtra DGP Rashmi Shukla, Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, "We welcome the decision taken by the Election Commission against Maharashtra DGP Rashmi Shukla." pic.twitter.com/nAx2DPxnrx
— ANI (@ANI) November 4, 2024
दरम्यान, महाविकासआघाडीतील प्रमुख पक्षांनी काही मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत. त्यावर चर्चा सुरु असून काही चर्चा पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या संपर्कादरम्यानस झालेल्या चर्चेनुसार शिवसेना (UBT) शेकापसाठी आलीबाग, पनवेल आणि पेण हे तीन मतदारसंघ सोडत आहे. तर, उरण हा मतदारसंघ शेकाप शिवसेना (UBT) साठी सोडणार असल्याची माहिती खासदार, संजय राऊत यांनी दिली आहे.