Sharad Pawar,Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या केंद्र सरकारच्या हस्तक्षेबाबात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीतून ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली. तसेच गरज पडल्यास आपण एकदा पश्चिम बंगालचा दौरा करावा असेही म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, गरज पडल्यास शरद पवार हे पश्चिम बंगालचा दौरा करतील असे म्हटले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्ष चांगलाच कार्यरत झाला आहे. काही झाले तरी या राज्यातील सत्ता हाती घ्यायचीच अशी या पक्षाची रणनिती आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा सामना रंगू लागला आहे. त्यातच केंद्र सरकारही मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये हस्तक्षेप करत आहे, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली.

नवाब मलिक यांनी माहिती देताना सांगितले की, पश्चिम बंगाल सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा केंद्राच्या अधिकारांचा गैरवापर करीत आहे. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. कोणत्याही संमतीशिवाय आयपीएस अधिका्याला राज्यातून माघार घेण्यात आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यासंदर्बात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी या संदर्भात चर्चा केली. (हेही वाचा, केंद्राला घाबरायचं की लढायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत रोखठोक विधान)

पुढे बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले की, शरद पवार हे इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत या विषयावर चर्चा करतील. ही बैठक दिल्लीत एखाद्या ठिकाणी असेल. जर गरज भासली तर पवार नक्कीच पश्चिम बंगालला जातील