Navi Mumbai: नवी मुंबईत एसटी बसमध्ये तरुणीचा लैंगिक छळ; कंडक्टरवर गुन्हा दाखल
Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांनी (New Mumbai Police) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बसच्या एका कंडक्टरवर (Bus Conductor) एका महिला प्रवाशाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी (Sexual Harassment) गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी 48 वर्षीय कंडक्टरविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, 26 आणि 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ती दापोलीहून मुंबईला जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. तेव्हा ती झोपली असताना आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा -Mexican DJ Rape Case: मेक्सिकन महिला डिस्क जॉकीवर बलात्कार, मुंबई येथून एकास अटक)

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत 23 वर्षीय तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी एका किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली. कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.

मृत मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी गोवंडीच्या मुंबई उपनगरातील होता. वृत्तानुसार, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 305 (अल्पवयीन व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 376(2)(n) (पुन्हा बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा - Kalyan Double Murder: कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून केला खून, आरोपी फरार)

अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या निवेदनानुसार, आरोपीने पीडितेशी मैत्री केली आणि नंतर ती अल्पवयीन आहे हे जाणून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ज्यामुळे ती गरोदर राहिली. 28 नोव्हेंबर रोजी या घटनेमुळे व्यथित झालेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.