Sextortion In Ratnagiri: तरुणाचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेकडून तरुणास पन्नास हजारांचा गंडा
Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

हल्ली ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकारणात मोठी वाढ झाली आहे. पुणे (Pune), मुंबई (Mumbai),नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad) यांसारख्या मोठ्या शहरांनंतर आता रत्नागिरी सारख्या शांतप्रिय जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारात एका तरुणास तब्बल पंन्नास हजारांचा फटका बसला आहे. तरुणास एका अनोळखी महिलेचा कॉल (Unknown Call) आला. दरम्यान ती तरुणाबरोबर सेक्सचॅट (Sex Chat) करु लागली. तरुणही उत्तेजित होवून या महिलेशी जोमात बोलू लागला. बघता बघता व्हिडीओ कॉलवर (Video Call) गप्पा रंगल्या. महिलेने तरुणाचा विश्वास संपादन केला. तरुण आपल्या जाळ्यात अडकलाय असा वेध घेत महिलेने व्हिडीओ कॉलवर (Video Call) स्वतचे कपडे काढण्यास सुरुवात केली. तरुणास ही त्याचे कपडे काढण्यास सांगितले. पहिले तरुणाने नकार दिला पण महिलेस अर्धनग्न अवस्थेत बघत तरुण व्हिडीओ कॉलवर नग्न झाला. हा व्हिडीओ कॉल लांब वेळ चाल्ला.

 

हा व्हिडीओ कॉल (Video Call) संपल्यानंतर महिलेने या तरुणाला कॉल (Call) केला आणि थेट पन्नास हजारांची मागणी केली. दरम्यान तरुणाने कसले पैसे असा प्रश्न विचारल्यास महिला उत्तरली मी तुझा नग्न अवस्थेतला व्हिडीओ शुट (Video Shoot) केला आहे. तु मला पैसे न दिल्यास हा व्हिडीओ मी युट्ययबवर अपलोड (YouTube) करेन. घाबरलेल्या तरुणाने महिलेला ५० हजार ५०० रुपये ट्रान्सफऱ केले. (हे ही वाचा:- Nashik Robbery: नाशकात दरोडेखोरांची दहशत, दरोड्यात मौल्यवान ऐवज लंपास करत 65 वर्षीय वृध्दाची हत्या)

 

घडलेला हा सगळा प्रकार तरुणाने पोलिसास सांगण्याचे ठरवले आणि रत्नागिरी पोलिस (Ratnagiri Police) स्थानक गाठले आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तरुणाने सांगितलेला प्रकार ऐकुन पोलिसही चक्रावले तसेच या प्रकारच्या कुठल्याही ऑनलाईन व्हिडीओ कॉल (Online Video Call), फोनला प्रतिसाद न देण्याचा सल्ला दिला. तसेच या महिलेसह तरुणाविरोधात देखील केस फाईल केली. रत्नागिरी पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. तसेच सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाकडून देखील याबाबत वारंवार सुचना देण्यात येतात. तरी नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.