Sex Racket Busted in Vasai: वसईत पोलिसांकडून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;  कपलला अटक करत 4 महिलांची सुटका
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits- Twitter)

Sex Racket Busted in Vasai: वसईतील अॅन्टी ह्युमन ट्राफिंगच्या सेलकडून एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये 4 महिलांची सुटका करण्यात आली असून कपलला अटक करण्यात आले आहे. यामधील बहुतांश जण हे उच्च शिक्षित असून त्यांनी मास्टर्स आणि एमबीए डिग्री घेतलेले आहेत. मात्र तरीही त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती केली जात होती. अटक करण्यात आलेल्या कपलमधील संदीप पाल हा मॅकानिकल इंजिनिअर असून जिया जावडेकर असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. हे दोन्ही आरोपी वसई पश्चिम येथील राहणारे आहेत.(Mumbai: Bandra-Worli Sea Link वर स्टंट्स करणाऱ्या दोन रशियन नागरिकांना अटक)

पोलिसांनी असे म्हटले आहे की, पाल आणि जावडेकर यांना या महिलांचे CV एका जॉब पोर्टलवरुन मिळाले. त्यांना या दोघांनी फोन करुन वसईतील ऑफिसमध्ये इंटरव्यूसाठी बोलावत त्यांना पर्सनल सेक्रेटरी म्हणून नोकरी देतो असे सांगितले. त्यानंतर या महिलांचे फोटो मॉर्फ करुन त्यांना हे कपल ब्लॅकमेलिंग करु लागले. यामधील काही जणींना नोकरी सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा कर्मशिअल वेश्याव्यवसयात ढकलण्यात आले.(घरात घुसून पत्नीची छेडछाड, पतीची हत्या प्रकरणात दोघांना अटक; विरार मधील धक्कादायक घटना)

आरोपी डेटिंग अॅपचा वापर करुन कस्टमर्सला कॉन्टॅक करत असे. मात्र ज्यावेळी आम्हाला महिला आणि कस्टमरमध्ये नवघर मानीकपूर एसटी बस डेपो येथे भेटणार असल्याचे समजातच आम्ही कट रचत महिलांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी जावडेकर हिच्या घरी छापेमारी केली असता तेथे असलेल्या तीन महिलांची सुद्धा सुटका करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.