Sex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट  उघड; 5 महिलांची सुटका
Sexually Assault | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ठाण्यामध्ये (Thane) एका महिलेसह दोघांना सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आज (21सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार,यामधून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई त्यांना मिळालेल्या एका टीप वरून केली आहे. एक महिला तिच्या काही सहकार्‍यांसोबत ग्राहकांना महिला पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी एक टीम बनवत सोमवारी रात्री कपूरबावडीवर धाड घातली.

दरम्यान पोलिसांच्या या कपूरबावडी मधील धडक कारवाईनंतर सुटका करण्यात आलेल्या महिलांना रिहॅब मध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. इंडियन पिनल कोड अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. तसेच Immoral Traffic (Prevention) Act अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच छापा टाकून तिची सुटका केली असून याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. संबंधित अभिनेत्रीची 4 लाखात विक्री केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सांताक्रुझ पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखा 7 नेही कारवाई केली आहे.