Dr. Anil Awachat Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे पुणे येथे निधन
Dr. Anil Awachat | (Photo Credit - YouTube)

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन (Dr. Anil Awachat Passes Away) झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. पुणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवटच (Dr. Anil Awachat) यांच्या जाण्याने लेखण आणि सामाजकार्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सामाजपरीवर्तनात मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांच्या जाण्यानंतर व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे अनिल अवचट यांचा जन्म झाला. बी. जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसची पदवी घेतली. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी अनेक आंदोलने, चळवळींध्ये भाग घेतला. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यामुळे त्यांनी अनेक विषयांमध्ये काम केले. (हेही वाचा, डॉ. न.म.जोशी आणि अनिल अवचट यांना महाराष्ट्र साहित्य परिषद 2020 चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर)

अनिल अवचट हे लेखक होते तसेच ते पत्रकारही होते.त्यांनी आपल्या एकूण आयुष्यात व्यवसायिक पत्रकारीतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपले संबंध आयुष्य हे गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरलेल्या दिनदुबळ्यांसाठी वाहिले. प्रामुख्याने आपल्या पत्रकारितेतून त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.

अनिल अवचट यांनी 1969 मध्ये त्यांनी पूर्णिया हे पहिले पुस्तक प्रकाशीत केले. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. आतापर्यंत त्यांनी 22 पूस्तके प्रकाशीत केली आहे.

डॉ. अनिल अवचट यांनी पुणे येथे मुक्तांगण नावाचे व्यसनमुक्ती केंद्र सरु केले. अनिल अवचट आणि त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे केंद्र सुरु केले. त्यांनी व्यसनमुक्तीसाठी वापरलेली पद्धत ही जगभर अनेक व्यसनमुक्ती केंद्रांतून वापरली जाऊ लागली आहे.