School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी शाळा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, पुणे (Pune) महानगरपालिकेच्या हद्दीत शाळा 4 जानेवारी पासून सुरु करण्यात येणार आहेत. मात्र इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठीच हे शाळा खुल्या होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व शाळांना कोविड-19 (Covid-19) नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. यापूर्वी पुणे शहरातील शाळा 3 जानेवारी पर्यंत बंद राहणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते.

दिवाळीनंतर इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. तसंच आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर 5 ते 8 वी चे वर्ग सुरु करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट आहे. (Schools Reopen In Nashik: नाशिक येथे येत्या 4 जानेवारी पासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु होणार, छगन भुजबळ यांची माहिती)

ANI Tweet:

दरम्यान, राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 23 डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र अद्याप मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरातील शाळा बंदच आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ लागला आहे. लेटेस्ट अपडेट्सनुसार, राज्यात आज कोविड-19 चे 3,580 नवे रुग्ण आढळून आले असून 89 मृतांची नोंद झाली आहे. तर आज 3,171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 19,09,951 वर पोहचली असून 18,04,871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 54,891 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील पालिका हद्दीत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.