Schools Reopen In Nashik: देशभरासह राज्यात कोरोनाचे महासंकट अद्याप कायम आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांहून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहेच. पण राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप कोरोनाची परिस्थितीत सुधारली नसून त्या ठिकाणी शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. याच पार्श्वभुमीवर नाशिक येथे येत्या 4 जानेवारी पासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु केले जाणार अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.(KDMC: वगळलेली 'ती' 18 गावे आता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतच; मुंबई उच्च न्यायायालयाचा निर्णय)
नाशिक जिल्ह्यात 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणीसह पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवण्याची भीती यामुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला. परंतु आता नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक मध्ये शाळा सुरु करण्यात येणार आहे. परंतु शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापकांनी कोरोनाची चाचणीसह निर्जंतुकीकरणाच्या कामची पूर्व तयारी सुरु करावे अशा सुचना छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.(Mumbai AC Local: मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण एसी लोकल सेवा सुरु, प्रवाशांनी केले स्वागत)
Tweet:
नाशिक जिल्ह्यात येत्या ४ जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळां सुरु केल्या जातील - छगन भुजबळ https://t.co/uhyP27RGXu
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 19, 2020
दरम्यान, छगन भुजबळ यांची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात एक बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. तर ग्रामीण भागात शाळा सुरु करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रातील शाळेचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे ही भुजबळ यांनी म्हटले आहे. तर मुंबई, ठाणे आणि पुण्यात अद्याप शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु येथील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.