Savitribai Phule Jayanti March (Photo Credits: Twitter)

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजेच सावित्रीबाई ज्योतिबा फुले (Savitribai Jyotiba Phule) यांची आज, 3 जानेवारी रोजी 188 वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून आज देशभरात अनेक ठिकाणी अभिवादनपर रॅली आयोजित करण्यात आल्या आहेत. महिला, ट्रान्सजेंडर आणि LGB समुदायाच्या प्रतिनिधींच्या पुढाकाराने कोलकाता(Kolkata), दिल्ली (Delhi), बंगळुरू (Bangalore) , रांची (Ranchi) , अहमदाबाद (Ahemdabad) सहित मुंबई (Mumbai) त देखील या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून देशात सध्या बहुचर्चित ठरलेल्या एनपीआर (NPR), एनआरसी (NRC) , सीएए (CAA)  आणि ट्रान्स कायदा (Trans Act) 2019 याचा विरोध दर्शवण्याचे काम केले जाईल. मुंबईतील हा मोर्चा संध्याकाळी 6 वाजता दादर (Dadar) येथील चैत्यभूमी (Chaityabhumi) पासून सुरु होणार आहे. #नफरतकेखिलाफसावित्रीबाई या हॅशटॅगखाली या मोर्चात निदर्शने केली जातील.

सावित्रीबाई या महिला सबलीकरणाचे जिवंत उदाहरण होत्या, समाजातील आक्षेपार्ह्य गोष्टींवर त्यांनी आपल्या काळात मोठा लढा दिला. सद्य घडीला काही कायद्यांमुळे देशभरात देखील प्रचंड संताप पाहायला मिळत आहे, नागरिकत्व सुधारणा कायदा असो एनआरसी असो किंवा तृतीयपंथींना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात तयार करण्यात आलेला ट्रान्स ऍक्ट असो या विषयांवर संबंधित घटकांना उघडपणे विरोध करण्याची संधी देण्यासाठी आज हे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. क्रांतीज्योती सावित्री यांच्याप्रमाणेच आताच्या महिला व तृतीयपंथी निर्भीडपणे समोर येऊ शकतील असा यामागील हेतू आहे.

पहा ट्विट

आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. आपल्या घरासाठी, स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या सर्वांचे श्रेय हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे, हीच प्रेरणा उत्तरोत्तर टिकून राहो अशी इच्छा आणि या प्रेरणेचा स्रोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.