Maharashtra Government Job (Photo Credits: File Image)
Maharashtra Mega Bharti 2020: नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि किमान 12 वी उत्तीर्ण अश्या उमेदवारांसाठी आता महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या पुरुष सुरक्षा रक्षक पदाच्या 700 रिक्त जागांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्यात येणार आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांना 10 मार्च च्या आधी mahasecurity.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे. दरमाह 17 हजार रुपये पगार आणि अन्य सरकारी भत्ते निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहेत.तसेच वर्षाला एक नवा युनिफॉर्म आणि शस्त्रधारी पदावर नेमणुक झाल्यास 1000 रुपये अतिरिक्त हत्यारी भत्ता देण्यात येणार आहे. या पदासाठी वयवर्षे 18 ते 28गटातील तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी 250 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. Sarkari Naukri LIC Recruitment 2020: एलआयसी मध्ये 218 जागांसाठी नोकरभरती; AE, AAO पदांसाठी 15 मार्च पर्यंत करू शकता licindia.in वर अर्ज

पात्रता निकष

प्राप्त माहितीनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांमध्ये पडताळून घेतले जाईल. ज्यानुसार, इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान 50 टक्के गुण प्राप्त असावेत. तसेच उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. निवडप्रक्रियेत, शारीरिक तपासणी समाविष्ट असेल, ज्यात 1600 मीटर धावण्याची शर्यत असेल, यातील वेळेच्या फरकानुसार गुण दिले जातील. तसेच, उमेदवाराची उंची 170 सेमी पेक्षा कमी नसावी. उमेदवाराचे वजन 60 किलो पेक्षा कमी नसावे. छाती न फुगवता 79 सेमी आणि श्वास भरून पाच सेमी अधिक असावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या धिकृत वेबसाईटला भेट द्या.

कसा कराल अर्ज?

  • MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा
  • Recruitment च्या लिंक वर क्लिक करा
  • Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा
  • ऍप्लिकेशन फॉर्म पेज दिसेल त्यात आवश्यक माहिती अचूक भरा.
  • अर्ज केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल.
  • प्रवेश शुल्क भरून आपला स्कॅन फोटोग्राफ अपलोड करा.

दरम्यान, भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड झाल्यास उमेदवारांना दोन महिने प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर रुजू करण्यात येणार आहे. तसेच भरती झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नेमणूक करण्यात येईल.