सरकारी नोकरीच्या शोधात असणार्या तरूणांसाठी एलआयसीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. एलआयसीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये 218 जागांसाठी नोकरभरती होणार आहे. दरम्यान ही नोकरभरती सहाय्यक अभियंता (AE) आणि सहाय्यक प्रशासाकिय आधिकारी (AAO) पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 15 मार्च पर्यंत licindia.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.
उमेदवाराच्या निवडीसाठी इच्छुकांना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा सामना करावा लागणार आहे. 4 एप्रिलला त्यासाठी पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या मुख्य परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर उमेदवार मुलाखतीसाठी निवडला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पुढील वर्षभरासाठी प्रोबेशन पीरियडवर घेतले जाईल. हा काळ पुढे दोन वर्षांसाठी वाढवला जाईल. Sarkari Naukri SSC Phase VIII Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1300 जागांवर मेगाभारती; ssc.nic.in वर करा ऑनलाईन अॅप्लिकेशन.
पात्रता निकष
उमेदवाराचं शिक्षण पदवी पर्यंत असणं आवश्यक आहे तर सहाय्यक प्रशासाकिय आधिकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर्सची पदवी आवश्यक आहे. तर वय 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत कमाल 21 वर्ष आणि किमान 30 वर्ष असणं आवश्यक आहे. आरक्षित जागांसाठी ही मर्यादा 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. इथे वाचा सविस्तर माहिती.
दरम्यान इच्छुक उमेदवाराला यासाठी 700 रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना आता 85 रूपये शुल्क भरावं लागणार आहे. दरम्यान निवड होणार्या उमेदवारांना 57,000 रूपये पगार मिळणार आहे.