Sarathi Sanstha Meeting: सारथी संस्थेच्या सभेत मानापमान नाट्य; संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्याने गोंधळ
Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सारथी संस्थेच्या बैठकीत (Sarathi Sanstha Meeting) आज मानामपमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना सभेवेळी तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याने हा गोंधळ झाल्याचे समजते. संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्याबद्दल मराठा समाज समन्वयकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यातून गोंधळ निर्माण झाला. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी गोंधळाच्या परिस्थितीत सामंजस्याची भूमिका घेतली. तसेच, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी मध्यस्थी करत संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केली. त्यातून गोंधळ कमी होऊन मिटल्याचे समजते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत महत्त्वाची बैठक बोलावली होती. मराठा समाज विकासासाठी सारथी संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेला सरकारकडून भरीव आर्थिक तरतूद करवी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येते आहे. या मागणीवर चर्चा करण्यासाठीच आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (हेही वाचा, Coronavirus: अत्यावश्यक सेवेत नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होऊ शकते; मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत)

दरम्यान, या बैठकीसाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. छत्रपती उपस्थित असताना इतरांना बसायला पुढचे स्थान आणि छत्रपतींना बसण्याची जागा तिसऱ्या रांगेत दिली. आम्हाला हे योग्य वाटत नाही, असे म्हणत मराठा समाजाच्या काही समन्वयकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, आपण छत्रपती म्हणून नव्हे तर समाज म्हणून आलो आहोत, अशी भूमीक संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली.

सारथी संस्थेबाबतच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.