राज्यातील अत्यावश्यक सेवा, कोविड योद्धे व त्यांच्याशी संबंधित विभागातील कर्मचारी वगळता वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची वेतन कपात (Pay Cut) करावी लागेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार हे पुनर्वसन विभागाच्या बैठकीकरता पुणे येथे आले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown)परिस्थितीमुळे पुढच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागू शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनास काहीशी कात्री लावण्याची आवश्यकता आहे, असे वडेट्टीवार यांनी या वेळी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर विचारविनीमय झाल्येच वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, करोनाच्या लढाईत आघाडीवर राहून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कुठलीही कपात केली जाणार नाही,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, महाराष्ट्र: COVID19 च्या परिस्थिती संदर्भात केंद्राकडून राज्य सरकारला कोणत्याही निधीची मदत नाही- विजय वडेट्टीवार)
We haven't received any fund from Centre if some leader says that we have received fund then he is betraying the state. However, there is no cash crunch for handling #COVID19 situation in the state: Maharashtra Minister Vijay Wadettiwar https://t.co/oDHOkOR7wp
— ANI (@ANI) July 2, 2020
सध्यास्थितीत राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे सारथी संस्थेलाही त्याचा फटका बसत आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत सारथी संस्था बंद केली जाणार नाही. केंद्र सरकारकडूनही सारथी संस्थेसाठी अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. हा निधी उपलब्ध झाला की लगेच तो सारथी संस्थेकडे वर्ग केला जाईल, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी या वेळी दिली.