Sanjay Raut Warns BJP: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप यांच्यात कथीत मकाऊ (Macau) प्रकरणावरुन जोरदार वाद रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे मकाऊ येथील कॅसिनोमधील कथीत फोटो एक्स हँडलवर शेअर केल्यने राजकीय वर्तुळात बरेच वादळ उठले होते. त्यावर भाजप नेत्यांकडून राऊत यांच्यावर जोरादर टिका झाली होती. यावर झाला येवढा तमाशा पुरे झाला. जेवढे खुलासे कराल तेवढे गोत्यात याल, असा इशारा राऊत यानी आगोदरच दिला होता. दरम्यान, आता तर राऊत यांनी थेट व्हिडिओच शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी एक्स हँडलवर शेअर केलेल्या कॅसिनोमधील व्हिडिओमध्ये भलेही भारतीय राजकारण्याचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे तशा अर्थाने या व्हिडिओची दखल घेण्याची गरज नाही. पण, राऊत यांनी या आधी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे एका कॅसिनोमध्ये बसलेले दिसतात. हा कॅसिनो मकाऊ येथील असल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे राऊत यांनी ही पोस्ट करताना बावनकुळे यांचा फोटो शेअर केला असला तरी त्यांचे नाव घेतले नव्हते. फक्त ती एक्स पोस्ट भाजपच्या ट्विटर हँडलला टॅग केली होती. त्यावर भाजपने प्रतिक्रिया देत 'आमचे प्रदेशाध्यक्ष कधीही कॅसिनोमध्ये जात नाहीत', असे म्हटले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत म्हटले होते की, आपण फॅमेलीसह मकाऊला गेलो होतो. आपण तिथे केवळ बसलो होतो. मकाऊ येथे कॅसिनो आणि हॉटेल एकत्रच असतात, असे म्हटले होते.
प्रकरणाची सीबीआय चौकशी करा- नाना पटोले
दरम्यान, संजय राऊत यांचे ट्विटर येताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार प्रतिक्रिया देत या प्रकरणाची चौकशी व्हावी असे म्हटले होते. पटोले यांनी तर थेट या प्रकरणाची सीबीआयद्वारेच चौकशी करावी अशी मागणी केली होती. सर्व प्रकारानंतर वातावरण काहीसे निवळत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत भाजपला डिवचले असून 'पिक्चर अभी बाकी है' असे म्हणत इशाराही दिला आहे.
व्हिडिओ
An Evening in Macau..
मकाऊ की रातें..
पिक्चर अभी बाकी है..@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @supriya_sule pic.twitter.com/0QHRCRgWcQ
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2023
व्हिडिओत काय?
संजय राऊत यांनी एक्स पोस्ट त्यांनी शेअर केले व्हिडिओमुळे नव्हे तर त्यात केलेल्या लिखाणामुळे आहे. व्हिडिओमध्ये विशेष असे काहीच नाही. हा व्हिडिओ कुठल्या तरी एका कथीत कॅसीनोमधील वाटतो आहे. ज्यामध्ये काही लोक टेबलवर बसले आहेत तर काही लोक चालत आहेत. मात्र, ही एक्स पोस्ट त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि भाजपच्या एक्स हँडलला टॅग केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे 'An Evening in Macau.. मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..'