
Chandrashekhar Bawankule in Casino: महाराष्ट्राचे राजकारण राजकीय, सामाजिक आरोप-प्रत्यारोपावरुन थेट आता राजकीय नेत्यांच्या व्यक्तीगत जीवनापर्यंत खाली उतरले आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांचा एक फोटो एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर केला. लगेच मग महाराष्ट्र भाजपनेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Whiskey) यांचा फोटो शेअर करत राऊत यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आरोप प्रत्यारोपांच्या या फैरीत महाराष्ट्रात मात्र कॅसिनो विरुद्ध व्हिस्की असा सामना रंगला आहे. राजकीय नेत्यांच्या व्यक्तीगत जीवनातील फोटो सार्वजिक करण्याची पद्धीत अलिकडील काळात भारतात नव्यानेच रुढ होऊ लागली आहे. भाजप नेत्यांनी मध्यंतरी राहुल गांधी यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने वाद रंगला होता.
'कॅसिनो विरुद्ध व्हिस्की' काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक्स हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ते कथीतरित्या कॅसिनो खेळत असल्याचे पाहायला मिळते आहे. या फोटोसोब केलेली पोस्ट राऊत यांनी अमित शाह, भाजप, देवेंद्र फडणीस आणि आदित्या ठाकरे यांना टॅग केली आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''19 नोव्हेंबर. मध्यरात्री. मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले. असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?'' ते तेच आहेत ना? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. यालाच जोडून आणखी एक फोटो पोस्ट करत राऊत यांनी ''महाराष्ट्र पेटलेला आहे... आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है.''
एक्स पोस्ट
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
ग्लासमध्ये कोणती व्हिस्की
राऊत यांच्या एक्स पोस्टवर महाराष्ट्र भाजपने तातडीने प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका कार्यक्रमात असल्याचे दुसून येते. या वेळी ते फरहान अख्तर यांच्या पाठिमागे उभे असून ग्लासमधून काहीतरी पित असल्याचे पाहायला मिळते. हा फोटो शेअर करताना महाराष्ट्र भाजपने म्हटले आहे की, ''आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्य च्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?
एक्स पोस्ट
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल
भाजपने संजय आदित्य ठाकरे यांचा फोट शेअर करताच संजय राऊत यांनी पुन्हा एक्स पोस्ट करत भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटे आहे की, 'ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!
बावनकुळे कॅसिनो प्रकरणाची सीबीआय चौकशी करा- नाना पटोले
दरम्यान, राऊत यांनी फोटो पोस्ट केल्यानंतर काँग्रेसनेही तातडीने प्रतिक्रिया दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोची सरकारने तातडीने चौकशी करावी. गरज पडल्यास याची सीबीआय चौकशीही करावी. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा आलाच कुठून? असा सवाल करत पटोले यांनी चौकशीची मागणी केली आहे.