केंद्रात सत्तारुढ असलेल्या भाजपवर (BJP) शिवसेना नेते संजय राउत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. राउत यांनी असे म्हटले की, दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नहेरु यांचा दूरदृष्टिकोनामुळेच देशातील सध्याची आर्थिक स्थिती ठासळण्यापासून बचाव झाला आहे. अशातच सध्याच्या सरकार कडून त्यांच्या द्वारे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय संपत्तीची विक्री केली जात आहे. याचा ते आनंद घेत आहेत. शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते राउत यांनी पुढे असे म्हटले की, भाजप सरकारचे सोनिया गांधी, राहुल किंवा प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासोबत मतभेद असतील. पण जवाहरलाल नेहरु यांच्या प्रति द्वेष का आहे? नेहरु यांच्या द्वारे तयार करण्यात आलेल्या संस्था या सरकार कडून अर्थव्यवस्थेला गति देण्याच्या नावाखाली विक्री केल्या जात आहेत.
राउत यांनी हे विधान भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम अजाद यांचे फोटो भारताच्या स्वातंत्र्यच्या 75 व्या वेळी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऐतिहासिक अनुसंधान परिषद यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रचारावरुन हटवण्यादरम्यान केले आहे. नेहरु यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या वारसावर जोर देत म्हटले की, सरकारला आता त्यांच्या द्वारे तयार करण्यात आलेली संपत्ती विक्री करण्यास मजा येत आहे. तुम्हाला नेहमीच नेहरु यांचे ऋणी रहायला हवे. पण तुम्ही स्वातंत्र्यता आंदोलनात त्यांची भुमिका संपुष्टातच आणली आहे. नेहरु यांच्या प्रति ऐवढा द्वेश का आहे. तुम्ही देशाला उत्तर द्यावे.(Sharad Pawar: मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या भाजपला शरद पवार यांचा सल्ला)
सामना मधून या कृत्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत राउत यांनी पुढे असे म्हटले की, नेहरु आणि आजाद यांच्या योगदानाशिवाय भारतीय स्वतंत्रता आंदोलनचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. फक्त असे लोक जे इतिहास घडवू शकत नाही ते दुसऱ्यांच्या इतिहासाला संपुष्टात आणणे ही हुशारपण मानतात. जे लोक स्वतंत्रता संग्राम पासून दूर राहिले आहेत आणि कधीच त्यात सहभागी झालेले नाही ते आता स्वातंत्रता आंदोलनातील नायकांमधील एकेकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही असे राउत यांनी स्पष्ट केले.