Sharad Pawar: मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या भाजपला शरद पवार यांचा सल्ला
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहुतकीसह बऱ्याच गोष्टी कोरोनाच्या निर्बंधाखाली सुरु करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. याचपार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत भाजपने (BJP) आंदोलन सुरु केली आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केंद्र सरकारनेच कोरोनासाठी नियमावली आखली आहे. त्यामुळे विरोधकांनी तारतम्य बाळगावे, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला आहे.

शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच पुण्यातील कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य करीत मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या भाजपला टोला लगावला आहे. 'कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. तसेच आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे, असे निर्देश दिले आहेत. परंतु, भाजपकडून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली जात आहे, आंदोलने सुरु आहेत. पण, विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे' असा सल्लावजा टोला पवारांनी लगावला आहे. हे देखील वाचा- कॉंग्रेस नेते Sushilkumar Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोलापूरात सुशील, सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल

दरम्यान, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता त्यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारकडून अशा संस्थांचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी केला जात आहे. हे दुर्देवी आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.