पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Redevelopment Scam) 100 दिवस तुरूंगात असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज (9 नोव्हेंबर) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. संजय राऊत यांच्यासोबत प्रविण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत आजच जेलबाहेर पडणार आहेत. 2 लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका झाली आहे. दरम्यान ईडी (ED) या निकालाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) कोर्टात जाणार आहेत.
संजय राऊत यांना 31 जुलै दिवशी अटक झाली होती. राहत्या घरी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर राऊतांचा दिवाळी, दसरा जेलमध्येच गेला होता. मुंबई मध्ये आर्थर रोड जेल मध्ये संजय राऊत यांचा मुक्काम होता. कोर्टात दोन्ही बाजूकडून दावे-प्रतिदावे करताना संजय राऊत बाहेर पडल्यास त्याचा प्रभाव या प्रकरणावर होऊ शकतो. असा दावा करण्यात आला आहे. नक्की वाचा: Patra Chawl Land Scam Case: ज्या पत्राचाळ प्रकरणामुळे Sanjay Raut, ED च्या रडार वर आले ते नेमके काय?
शिवसेनेसाठी संजय राऊत यांचा जामीन हा मोठा विजय आहे. संजय राऊत यांच्याकडे सामना वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी आहे. मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील संजय राऊत यांच्याकडे आहे. दसरा मेळाव्यामध्येही संजय राऊत यांची खूर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेकडून राऊत कुटुंबाची जातीने चौकशी केली जात होती. सध्या दौर्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना 'त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांनी दडपशाही समोर झूकून गद्दारी केली नसल्याचं म्हणत ते खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे.'
आज संध्याकाळी शिवसेना भवनामध्ये याचं सेलिब्रेशन होणार आहे. तसेच संजय राऊत यांच्या घराबाहेरही सेलिब्रेशनची तयारी आहे.