Sanjay Raut | (Photo Credits: YouTube)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कारागृहाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी आज (10 नोव्हेंबर) प्रथमच दीर्घ संवाद साधला. संजय राऊत हे पहिल्याच संवादात कोणावर निशाणा साधतात याबाबत उत्सुकता होतीच. या वेळी त्यांनी नेहमीची आक्रमक भाषा न वापरता संयमी भाषेत संवाद साधला. मात्र, नामोल्लेख करत त्यांनी पहिला हल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केला. शिवाय हे राज्य मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री चालवतात. त्यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नामोल्लेख न करता लगावला. कारागृहात असताना तुम्हाला एकट्याला राहावे लागते. भिंतींशी बोलावे लागते, कोणावरच अशी वेळ येऊ नये, असेही राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी संजय राऊत तुरुंगात जातील. त्यांनी एकट्याने भिंतींशी बोलण्याचा सराव करावा असे म्हटले होते. त्यांना माझे सांगणे आहे. शत्रू जरी असला तरी तोही कोणी तुरुंगात जावे असा विचार करत नाही. होय, मी तुरुंगात गेलो आणि बाहेरही आलो. मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती, असे मी नव्हे कोर्टानेच सांगितले, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले. केवळ मीच नव्हे या आधी सावरकर, टिळक हे देखील तरुंगात गेले होते. तुरुंगातील माझा वेळ मी सत्कारणी लावल्याचेही राऊतांनी सांगितले. (हेही वाचा, Sanjay Raut's Saamana Editorial: संजय राऊत यांच्या 'एन्ट्री'नंत 'सामना' पुन्हा रंगणार? 'मार्मिक' फटकेबाजीबद्दल शिवसैनिकांमध्ये उत्सुकता)

ट्विट

मी तीन महिन्यांनी माझ्या हातात घड्याळ बांधले आहे. मी तुरुंगातून तीन महिन्यांनी बाहेर आलो. मला वाटलं लोक मला विसरतील. पण तसे घडले नाही. हे आपल्या सर्वांचे प्रेम आहे. शिवसेनेने दिलेले प्रेम आहे. कारागृहातील दिवस खरोखरच खडतर होते. मी आताच त्यावर बोलणार नाही. पण, या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माझी नियमीत चौकशी केली. माझ्या कुटुंबाला धिर दिला. मी त्यांनाही भेटणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

ट्विट

दरम्यान, कटूता संपायला हवी. राज्याच्या देशाच्या राजकारणात संविधानीक पदावर बसलेल्या व्यक्तींना भेटणे गैर नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटणार आहे. देशातील परिस्थीती त्यांनाही समजावून सांगणार आहे. मधल्या काळात या सरकारने काही निर्णय चांगले घेतले. परंतू, हे सरकार घटनाबाह्य आहे, यात माझ्या मनात तिळमात्रही शंका नसल्याचे संजय राऊत म्हणाले.