Sangli: नागाच्या डोक्याचा मुका घेणाऱ्या तरुणाला वन विभागाकडून हिसका, सांगली येथील युवकाचा जीवघेणा स्टंट
Nag Panchami 2019 Jokes (Photo Credit : Pixabay)

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका तरुणावर वन विभागाने (Sangli Forest Departmen) गुन्हा दाखल केला आहे. जीवघेणा स्टंट करण्याच्या नादात या तरुणाने चक्क फडी काढलेल्या सापाच्या डोक्याचाच मुका घेण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. प्रदीप अशोक अडसुळे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याच्या या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( Viral Video) झाला आहे. प्रदीप हा स्वत: सर्पमित्र असल्याचे सांगतो. तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद (Case registered) करण्यात आला आहे.

प्रदिप अडसुळे आण त्याचा मित्र एका शेतात साप पकडत होते. त्यांनी साप पकडला. मात्र हा साप नाग प्रजातीतील असल्याने त्याने फणा काढला. सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात या तरुणाने चक्क या सापाच्या डोक्याचे चुंबण घेण्याचा विचित्र प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे त्याने या प्रकाराचा व्हिडिओ करुन सोशल मीडियावर प्रसारीत केला. व्हिडिओ व्हायरल होताच वन विभागाने दखल घेत त्याच्यावर कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार सांगलीचे उपवनसंरक्षक डॉ. अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांनी केलेल्या मार्गदर्शानुसार सचिन जाधव (वनक्षेत्रपाल शिराळा), सुरेश चरापले व(नपाल इस्लामपूर) व अमोल साठे (वनरक्षक बावची) व निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने या तरुणाविरोधात कारवाई केली.

वन्य जीवांना त्रास देऊन कोणीही जीवघेणे स्टंट करु नये. असे केल्याने वन्य जीव आणि स्टंट करणारा व्यक्ती अशा दोघांच्याही जीवाला धोका असतो. त्यामुळे असे स्टंट करणे टाळावे, अन्यथा वन विभाग कादेशीर कारवाई करेन, असेही वनविभागाने म्हटले आहे.