Photo Credit- X

Saif Ali Khan Attacker Arrested: सैफ अली खानवर (Saif Ali Khan)हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक (Attacker Arrest) केली आहे. सुरूवातीला विजय दास असे आरोपीने नाव सांगितले होते. त्यानंतर तपासादरम्यान, मोहम्मद आलियान नाव असल्याची त्याने कबूली दिली. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. दरम्यान आरोपी मुंबईतील पबमध्ये काम करायचा. त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलिस पत्रकारपरिषदेतून सविस्तर माहिती देणार आहे.(Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील)

16 तारखेला हल्ला

गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर दुखापत झाल्यानंतर, सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन ते तीन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सैफचं घर 12 व्या मजल्यावर असून याच इमारतीच्या फायर एक्झिटच्या जीन्यावर सहाव्या मजल्यावर हा चोर सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणामध्ये काही संक्षयितांना अटक करण्यात आली होती.

हल्ल्याच्या वेळी घरात नोकर उपस्थित

गुरुवारी पहाटे हल्ला झाला तेव्हा सैफ अली खानच्या घरात 3 महिला आणि 3 पुरुष नोकर होते. इब्राहिम आणि सारा अली खान देखील याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहतात. हल्ल्यानंतर ते आले आणि सैफ अली खानला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. घरी चालक उपस्थित नव्हता.

आरोपी बारमध्ये काम करायचा

आरोपी ठाण्यातील रिकी बारमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करत होता, असे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपीला रिमांडवर घेतील आणि तो सैफ अली खानच्या घरात का घुसला, त्याचा हेतू काय होता आणि त्याने सैफ आणि त्याच्या मोलकरणीवर प्राणघातक हल्ला का केला? याची चौकशी करतील.

छत्तीसगडमधून संशयिताला अटक

छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. 31 वर्षीय तरूणाचे आकाश कैलाश कनोजिया नाव आहे. दुर्ग जिल्ह्यात ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढत असताना संशयिताला छत्तीसगड रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ताब्यात घेतले.