
Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस डेपो (Swargate Bus Depot) मध्ये महिलेवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (Dattatreya Ramdas Gade) वर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासोबतच राज्यातील सर्व बस डेपोच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाईल. बैठकीदरम्यान, पुणे राज्य परिवहन विभागाच्या प्रमुखांना स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेल्या घटनेचा संपूर्ण अहवाल पुढील सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
काय आहे प्रकरण ?
मंगळवारी सकाळी स्वारगेट बस स्थानकांत पार्क केलेल्या राज्य परिवहन बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केला. आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. संशयित दत्तात्रेय रामदास गाडे (वय, 36) याच्यावर चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत, असे स्वारगेट पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. स्वारगेट बस स्थानक हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वात मोठ्या बस जंक्शनपैकी एक आहे. (हेही वाचा - Swargate Rape Case: स्वारगेट बस डेपो मधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन)
तक्रारदार तरुणीच्या मते, मंगळवारी पहाटे 5:45 वाजता ती सातारा जिल्ह्यातील फलटणला जाणाऱ्या एका स्टँडवर बसची वाट पाहत होती, तेव्हा एक पुरूष तिच्याकडे आला, तिच्याशी बोलू लागला आणि तिला 'दीदी' म्हणून हाक मारली. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला सांगितले की, साताऱ्याला जाणारी बस दुसऱ्या स्टँडवर आली आहे. त्यानंतर तो तिला स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या एका रिकाम्या 'शिवशाही' एसी बसमध्ये घेऊन गेला. (हेही वाचा -Swargate ST Bus Stand Vandalized: वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक)
बसमधील दिवे चालू नसल्याने सुरुवातीला ती बसमध्ये चढण्यास कचरत होती. परंतु, आरोपीने तिला खात्री दिली की ती योग्य बस आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला बसमध्ये चढल्यानंतर टॉर्च चालू करण्यास सांगितले. त्यानंतर तो तिच्या मागे आत गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या दृश्यकृत्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी गाडेची ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस उपायुक्त स्मार्ता पाटील यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी आरोपीसोबत बसकडे जाताना दिसत आहे. घटनेच्या वेळी बस स्टँड परिसरात बरेच लोक आणि अनेक बसेस होत्या. घटनेनंतर महिलेने लगेच पोलिसांशी संपर्क न साधता फलटणला जाणाऱ्या बसमध्ये चढली. प्रवासादरम्यान तिच्या मैत्रिणीला फोनवरून तिच्यासोबर घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीच्या सल्ल्यानंतर पीडिता पोलिस स्टेशनला गेली.