
स्वारगेट बस डेपो (Swargate Bus Stand) मध्ये पहाटे 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर यावर संताप व्यक्त होत आहे. तरूणीवरील अत्याचाराची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये स्वारगटे बस डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे. आता डेपो मध्ये नवे सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रक यांच्यावरही आगामी काळात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. सोबतच डेपो मॅनेजरची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे.
स्वारगेट बस डेपो मधील घृणास्पद प्रकारानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यासाठी उद्या (27 फेब्रुवारी) एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
आज (26 फेब्रुवारी) पहाटे पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात पीडीत महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. घटनेची