
Maharashtra: RBI कडून बाबाजी दाते महिला सरकारी बँकेवर कारवाई, खात्यातून फक्त 5 हजार रुपये काढता येणार आरबीआयकडून महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक(Babaji Date Mahila Urban Bank), यवतमाळ वर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, खातेधारकांना आता त्यांच्या खात्यातून केवळ 5 हजार रुपयेच काढता येणार आहेत. केंद्रीय बँकेने सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने हे पाऊल उचलले आहे.
आरबीआयने असे म्हटले की, बँकिंग विनियमन अधिनियम 1949 अंतर्गत निर्बंध 8 नोव्हेंबर पासून व्यवसाय बंद होण्यापासून पुढील सहा महिन्यापर्यंत लागू असणार आहेत. यवतमाळची ही सहकारी बँक आता आरबीआयच्या कोणत्याही परवानगी शिवाय पेमेंट किंवा एखाद्याला कर्ज देऊ शकत नाही. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यवस्थेत सहभागी होण्यासह आपली संपत्ती विक्री करु शकत नाही. तर एका विधानात असे सांगण्यात आले आहे की, सध्या बँकेतून खातेधारकांना फक्त 5 हजार रुपयेच काढता येणार आहेत.(Maharashtra: पालघर येथे 4.93 कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या 5 जणांच्या विरोधात कारवाई)
तसेच आरबीआयने कर्नाटकातील दावणगेरे स्थित मिलथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर ही लावण्यात आलेले निर्बंध हे 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. कर्नाटक स्थित सहकारी बँकेवर 26 एप्रिल 2019 मध्ये निर्बंध लावण्यात आले होते. ते वेळोवेळी सुधारण्यात आले. गेल्या वेळी निर्बंध 7 नोव्हेंबर पर्यंत लागू करण्यात आले होते.
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पंजाब अॅन्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकच्या ग्राहकांना पहिल्या लॉटमध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा बीमा कवर दिले जाणार नाही आहे. बँक सध्या मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक रेजॉल्यूशन प्रोसेस अंतर्गत आहे. डिपॉजिट इंश्युरन्स अॅन्ड क्रेटिड गॅरंटी कॉर्पोरेशन पहिल्या प्लॉटमध्ये PMC बँक सोडून 20 स्ट्रेड बँकांच्या ग्राहकांना पेमेंट करणार आहे. पहिल्या लॉटसाठी 90 दिवसांचा अनिवार्य कालावधी 30 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे.