ज्येष्ठ नेते आणि पाच वेळा नगरसेवक राहिलेले काँग्रेस नेता रवी राजा (Congress Leader Ravi Raja) यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस (Congress) पक्षाच्या शहर संघटनेस मोठा धक्का बसला आहे. राजा यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन आजच (31 ऑक्टोबर) भाजपात प्रवेश केला. राजा यांच्यासारखा स्थानिक पातळीवर भक्कम असलेला नेता गेल्यान महाविकासआघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. ज्याचा विशेष प्रभाव सायन कोळीवाढा (Sion-Koliwada) परिसरात जाणवेल असे सांगितले जात आहे.
बीएमसीमध्ये राजा पाच वेळा नगरसेवक
रवी राजा हे मुंबई महापालिकेत काँग्रेसकडून पाच वेळा नगरसेवक राहिले आहेत. ते सायन-कोळीवाडा येथून विधानसभा निवडणूक लढवू इच्छित होते. त्यासाठी पक्ष आपणास तिकीट देईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा असूनही हायकमांडने त्यांना तिकीट नाकारले, असा त्यांचा दावा आहे. राजा यांच्या ऐवजी काँग्रेसने गणेश यादव यांना तिकीट दिले, जे यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्याकडून 14,000 हून अधिक मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2024: महाविकासआघाडी आणि महायुती सोडवणार का बंडाचे ग्रहण? कुणाला विधानपरिषद, काहींना महामंडळाचे आमिष)
भाजपमध्ये प्रवेश करताना रवी राजा
#WATCH | Mumbai: Former Congress leader and former LoP of Mumbai Municipal Corporation Ravi Raja joins BJP in the presence of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis. pic.twitter.com/pHy1KJuSZf
— ANI (@ANI) October 31, 2024
तामिळ आणि मराठी मतदारांमध्ये विशेष प्रभाव
राजा यांच्या जाण्याने सायन-कोळीवाडामधील काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. खास करुन तामिळ आणि मराठी मतदारांमध्ये राजा यांचे विशेष संबध आहेत. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे असे मानले जाते. राजा यांनी भाजपात प्रवेश केल्याने सायन-कोळीवाडा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी अधिक आव्हानात्मक झाल्याचे मानले जात आहे. राजा यांच्या रुपात भाजपला एक महत्त्वपूर्ण स्थानिक प्रभावशाली नेता मिळेल, जो व्यापक मतदारांना आकर्षित करू शकेल. काँग्रेस नेत्यांनी अद्याप राजाच्या जाण्यावर भाष्य केलेले नाही, मात्र त्यांच्या पाठिंब्याच्या आधारावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो असे अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. (हेही वाचा, Worli Vidhan Sabha Constituency: वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध शिवसेना Milind Deora यांना उमेदवारी देणार?)
रवी राजा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
Congress leader and former LoP of Mumbai Municipal Corporation Ravi Raja resigns from Congress. He submitted his resignation to Congress President Mallikarjun Kharge
He will join BJP today in the presence of Maharahstra Dy CM Devendra Fadnavis
— ANI (@ANI) October 31, 2024
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. कास करुन उमेदवारी न मिळाल्याने नाराज मंडळी एक तर बंडखोरी करत आहे. किंवा ज्यांना बंडखोरी करणे शक्य नाही, त्यांच्याकडे तेवढी ताकद नाही असे लोक पक्षांतर करत आहे. या पक्षांतरांचा राजकीय विचारसरणीशी विशेष संबंध नसला तरी नजिकच्या राजकीय भविष्याच्या आकर्षणाने ही मंडळी पक्षांतर करण्यास प्राधान्य देत आहे. दुसऱ्या बाजूला आपला नेता नेमका कोणत्या पक्षात आहे, या प्रश्नावरुन कार्यकर्ता आणि मतदारही संभ्रमात आहेत.