रत्नागिरी: लांजा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना बहुमताने विजयी, भाजपला धक्का, मनोहर बाईत यांची नगराध्यक्षपदी निवड
Shiv Sena | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Ratnagiri, Lanja Nagar Panchayat Election Result 2020: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा नगर पंचायत (Lanja Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. इथे शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजप (BJP) पर्यायाने नारायण राणे असा सामना होता. त्यामुळे इथली जनता कोणाच्या बाजूने कौल देते याबाबत उत्सुकता होती. अखेर इथल्या जनतेने शिवसेनेच्या पारड्यात बहुमत टाकल्याने लांजा नगर पंचायतीवर सेनेचा भगवा फडकला आहे. एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. नगराध्यक्ष पद निवडणुकीतही शिवसेनेचे मनोहर बाईत निवडूण आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मावळते नगराध्यक्ष राजू कुरुप यांना नगरसेवक म्हणूनही निवडून येता आले नाही. शिवसेनेच्या मंगेश लांजेकर यांनी कुरुप यांचा पराभव केला.

लांजा नगर पंचायत निवडणूक विजयी उमेदवार (पक्ष आणि प्रभागनिहाय)

 • प्रभाग क्र. १- राजेश हळदणकर (अपक्ष)
 • प्रभाग क्र. २- पूर्वा मुळ्ये (शिवसेना)
 • प्रभाग क्र. ३- दुर्वा शेट्ये (अपक्ष)
 • प्रभाग क्र. ४- लहू कांबळे (शिवसेना)
 • प्रभाग क्र. ५- मधुरा बापेकर (अपक्ष बिनविरोध)
 • प्रभाग क्र. ६- प्रसाद डोर्लेकर (शिवसेना)
 • प्रभाग क्र. ७-शितल सावंत (भाजप)
 • प्रभाग क्र. ८-मधुरा लांजेकर (कॉंग्रेस)
 • प्रभाग क्र. ९-रफिक नेवरेकर (कॉंग्रेस)
 • प्रभाग क्र. १०-मंगेश लांजेकर (भाजप)
 • प्रभाग क्र. ११-सोनाली गुरव (सेना)
 • प्रभाग क्र. १२-वंदना कडगाळकर (सेना)
 • प्रभाग क्र. १३-संजय यादव (भाजप)
 • प्रभाग क्र. १४-यामिनी जोईल (सेना)
 • प्रभाग क्र. १५- स्वरूप गुरव (सेना)
 • प्रभाग क्र. १६- समृद्धी गुरव (सेना),
 • प्रभाग क्र. -१७ सचिन डोंगरकर (सेना)

(हेही वाचा, महानगरपालिका पोटनिवडणूक निकालांंमध्ये महाविकास आघाडीचा डंका; पहा BMC,नाशिक, नागपूर सह 6 महानगर पालिकांमध्ये कोण जिंकलं?)

कोकणा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे कोकणामध्ये शिवसेना आपली तागद राखून आहे. दरम्यान, मधल्या काळात नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच, पुढे त्यांनी स्वत: चा स्वभिमान पक्ष काढला जो वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच भाजपमध्ये विलिन केला. त्यामुळे नारायण राणे यांच्या रुपात शिवसेनेपुढे कोकणात आव्हान होते. या आव्हानाच्या माध्यमातून कोकणात शिवसेना पक्षाला विरोध होतो. विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये तो दिसूनही येतो. लांजा नगर पंचायत निवडणुकीतही तो दिसून आला. परंतू, लांजा येथील जनतेने शिवसेनेच्या बाजूने आपला कौल दिला.