Raosaheb Antapurkar Passes Away: नांदेडचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत कोविड 19 उपचारादरम्यान निधन
रावसाहेब अंतापूरकर | Photo Credits: Twitter/ Ashok Chavan

कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे काल कोरोना उपचारादरम्यान मुंबई मध्ये निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. नांदेड मधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. मात्र काल त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. कॉंग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. दरम्यान रावसाहेब अंतापूरकर हे अशोक चव्हाणांच्या निकवर्तीयांपैकी एक होते. COVID-19 Cases in Mumbai: मुंबईत आज 9200 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 898 वर.

नांदेड मध्ये काही दिवसांपूर्वी रावसाहेब यांची कोविड चाचणी केल्यानंतर ते पॉझिटीव्ह असल्याचं समजलं होते. त्यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील रूग्णालयात उपचार झाले पण प्रकृती खालावत असल्याने त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलेले नाही.

अशोक चव्हाण ट्वीट

दरम्यान कोविड 19 च्या संकटामध्ये कोरोनामुळे गमावलेले रावसाहेब अंतापूरकर हे दुसरे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी एनसीपी आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. ते पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे नेतृत्त्व करत होते. आता येथील पोट निवडणूकीमध्ये त्यांच्या मुलाला भगिरथ भालके ला आमदारकीचं तिकीट देण्यात आले आहे.