Maharashtra Assembly Election: राज ठाकरे यांच्याकडून राज्य सरकावर घणाघात; म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांचे राज्यावर लक्षच नाही!'
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2019) अवघे काहीच तास राहिले असून आज प्रचारचा शेवटचा दिवस आहे. यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रचार सभेंचा धडाका लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीच नवी मुंबई (Navi Mumbai) येथे सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी आक्रमक भुमिका घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी जागृत व्हा. थोडा विचार करा त्यानंतरच मतदान करा, असे अवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात या सरकारला जाब विचारण्यासाठी सक्षम असा विरोधीपक्ष नाही, यामुळे सरकार याचा गैरफायदा घेत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

नुकतीच राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे म्हणाले की, "सत्ताधारी पक्ष जाहिराती दाखवून मतदारांची दिशाभूल करत आहे. या निवडणुकीत निवडून आल्यावर जनेतेची कामे करु, असे अश्वासने भाजप, शिवसेना करत आहे. मग याआधीच्या 5 वर्षात काय करत होतात? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला आहे. "महाराष्ट्रातील ७५ टक्के टोलनाके हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद केले आहेत. शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात 10 रुपयात जेवण देऊ, असे अश्वासन दिले आहेत. यावरुनही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप, शिवसेना एकत्र निवडूक लढवत आहे, मग यांच्या वचननाम्यात बदल का?" असे बोलत राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Election 2019: राजकीय पक्षांच्या आज दिवभरातील प्रचारसभेच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षाच्या ठिकठिकाणी सभा सुरु आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच तासात राहिले असून येत्या २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात निवडणुक पार पडणार आहे.