Maharashtra Assembly Election 2019: राजकीय पक्षांच्या आज दिवभरातील प्रचारसभेच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक
Maharashtra Assembly Election 2019 (Photo Credit -File Photo )

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly elections 2019 ) आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला असून त्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून पक्षाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. आज सर्वच पक्षांनी प्रचारसभा, रोड शो आणि रॅलीचे आयोजन केले आहे. राज्यात आज कोणाच्या कुठे सभा आहेत ‘हे’ जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर वृत्त.

हेही वाचा - Maharashtra Assembly Elections 2019: सध्याच्या सरकारवर भ्रष्ट्राचाराचा डाग नाही; मुंबईच्या महायुतीच्या सभेत पीएम नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या दिवसभरातील सभा –

 • नवापूर – सकाळी ११.१५ वाजता
 • अकोले – दुपारी १.२० वाजता
 • कर्जत – दुपारी ३.१० वाजता

शरद पवार यांच्या आज दिवसभरातील सभा –

 • कर्जत येथे जाहीर सभा
 • भोर येथे जाहीर सभा
 • इंदापूर येथे जाहीर सभा
 • बारामती येथे जाहीर सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - 

 • नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ रोड शो
 • नागपूर, चंद्रपूर, भंडारा येथे सभा

उद्धव ठाकरे - 

 • सातारा, रायगड, माणगाव, श्रीवर्धन, उरण, कर्जत येथे जाहीर सभा

आदित्य ठाकरे - 

 • वरळीत बाईक रॅली
 • धारावी, चांदिवली, वांद्रे पूर्व येथे प्रचारसभा

राज ठाकरे –

 • नवी मुंबईत जाहीर सभा
 • ठाण्यात जाहीर सभा

२१ ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी  भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार लढत असून यंदाचा विधानसभा निवडणूक निकाल पाहणं सर्वांसाठी औत्सुक्याच ठरणार आहे. तसेच केंद्राप्रमाणे राज्यातदेखील भाजपचे वर्चस्व राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.