नुकतचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुत्र अमित ठाकरेचा (Amit Thackeray) विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर राज यांनी पालघर (Palghar) येथील 500 गरीब, आदिवासी मुलींचे लग्न लावले आणि कन्यादानाचे पुण्यही पदरी घेतले. या सामुदायिक विवाह सोहळ्यात राज ठाकरे यांनी कुटुंबियांसह हजेरी लावली. 'राज'पुत्र मितालीसोबत लग्नाच्या बेडीत; दिग्गजांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याला सुरुवात
यासंदर्भातील एक समानाधकारक ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. या ट्विट मध्ये राज ठाकरे यांनी लिहिले की, "नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला. पक्षातर्फे पालघर येथे आयोजित 500 आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्नसोहळा. ह्याबद्दल पक्षाचे अविनाश जाधव, कुंदन संखे आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन आणि नव-दाम्पत्यांना शुभेच्छा."
नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला. पक्षातर्फे पालघर येथे आयोजित ५०० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्नसोहळा.
ह्याबद्दल पक्षाचे अविनाश जाधव, कुंदन संखे आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन आणि नव-दाम्पत्यांना शुभेच्छा. 💐 pic.twitter.com/2WVruj5cRG
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2019
💐💐 लग्नसोहळा संपन्न... 💐💐 @avinash_mns @abhijitpanse @rajupatilmanase pic.twitter.com/qiLpquQAjF
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 9, 2019
27 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. मैत्रिण मिताली बोरुडे हीच्यासोबत अमित ठाकरे विवाहबद्ध झाला. या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्यासह बॉलिवूड स्टार्सही उपस्थित होते.