Amit Thackeray Mitali Borude Wedding: 'राज'पुत्र मितालीसोबत लग्नाच्या बेडीत; दिग्गजांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याला सुरुवात
Amit Thackeray Wedding | (Photo Credits : Instagram)

Amit Thackeray Mitali Borude Wedding: गेले अनेक दिवस चर्चेत असलेले कपल अर्थातच अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली बोरुडे (Mitali Borude) यांचा वलयांकीत विवाह आज (27 जानेवारी) संपन्न झाला. अमित ठाकरे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चिरंजीव आहेत. तर, मिताली ही बॅरिअॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी. म्हणजे एकूणच काय तर, दोन्हीकडील कुटुंबं ही वलयांकीत आणि प्रचंड लोकसंपर्क असलेली. त्यामुळे विवाहासाठी विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी येणार यात काही शंकाच नव्हती. लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेल येथे दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला.

दरम्यान, या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असणार आहे. तसेच अंबानी परिवार आणि रतन टाटा यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवुड आणि कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विवाहाचे निमंत्रण न देता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विवाहाचे निमंत्रण दिले होते. मात्र, राहुल गांधी यांची या विवाहाला उपस्थिती दिसली नाही.

मिताली आणि अमित हे बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्यातील मैत्रिला प्रेमाचा अंकुर फूटला. आता हाच अंकुर दिग्गजांच्या रुपात संसाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी एकत्र येत आहे. या दोघांचा वाढदिवस 11 डिसेंबर 2018 रोजी पार पडला होता. विशेष असे की 11 डिसेंबर हा राज ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. व्यंगचित्रे आणि आणि तडाखेबंद भाषणे यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांचे टॅलेंटही अमित यांच्यात उतरले आहे. अमित यांच्या भाषणांचा कस अद्याप लागला नसला तरी, ते स्केचिंग करत असल्याची नेहमीच चर्चा असते. (हेही वाचा, राज ठाकरेंची होणारी सून Mitali Borude नेमकी कोण ?)

काही दिवसांपूर्वीच लहानपणीची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्यासोबत अमित यांचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे 11 डिसेंबर रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवशीच दोघांचा साखरपुडा झाला होता. आपल्या भाषणांसोबत राज ठाकरेंना व्यंगचित्रासाठीही ओळखलं जातं. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे टॅलेंट आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात.

कोण आहे मिताली बोरूडे?

मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. मिताली फॅशन डिझायनर आहे. प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरूडे यांची ती कन्या आहे.