Amit Thackeray Mitali Borude Wedding : राज ठाकरे यांची होणारी सून Mitali Borude नेमकी कोण ?
Mitali Borude with Raj Thackeray (Photo Credits: Facebook/ Mitali Borude)

Amit Thackeray Mitali Borude Wedding :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray)  27 जानेवारी 2019 दिवशी  बोहल्यावर चढणार आहे. अमित त्याची मैत्रिण मिताली बोरूडे  (Mitali Borude) सोबत विवाहबंधनात अडणार आहे. मितालीच्या परिवाराचा राजकारणाशी थेट संबंध नाही. मग पहा ठाकरे कुटुंबीयांच्या घरचा उंबरठा ओलांडणारी मिताली बोरूडे  नेमकी कोण आहे? मिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही! पहा  खास फोटो

मिताली आणि अमित शाळा आणि कॉलेज दिवसांपासून मित्र मैत्रिण आहेत. सुरूवातीला मैत्री आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

 

View this post on Instagram

 

Watch this space for more... . .#Officialpost.

A post shared by Amit Thackeray (@amit.thackeray) on

मितालीचे वडील संजय बोरूडे हे मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल्समध्ये बेरिएट्रिक सर्जन  (Bariatric Surgeon)  आहेत.

borude and Thackeray Family
Borude and Thackeray Family (Photo Credits : Facebook / Mitali Borude)

मिताली ही मुंबईच्या रूईया कॉलेजची विद्यार्थिनी होती. रूईया ज्युनियर कॉलेजमध्ये ती आर्ट्स शाखेत शिकली. तर अमित ठाकरे पोद्दार कॉलेज वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. माटुंगाच्या रूपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले तर वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून एमबीए केलं आहे.

mitali and urvashi
Mitali With Urvashi Thackeray (Photo Credits : Facebook)

रूईयामधून बाहेर पडल्यानंतर मितालीने FAD International मध्ये फॅशन आणि डिझायनिंगचे शिक्षण घेतले. अमितची बहीण उर्वशी ठाकरेसोबत 'द रॅक' या त्यांच्या क्लोदिंग ब्रॅड्ससाठी डेस डिझाईनिंग करते.

 

View this post on Instagram

 

New boss in the house ❤ . .#Officialpost

A post shared by Amit Thackeray (@amit.thackeray) on

मुंबईत काही इव्हेंट्समध्ये उर्वशी आणि मिताली यांनी खास डेस डिझाईनिंग केलं आहे. अमित आणि मितालीच्या साखरपुड्याचा ड्रेसदेखील मितालीने डिझाईन केला होता.

मितालीच्या घरी तिचे आई, बाबा आणि भाऊ असं छोटंसं कुटुंब आहे. मितालीचा भाऊ

देखील वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी आहे.

मिताली अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यांमध्ये, सभेदरम्यान अमित सोबत दिसली आहे. दरम्यान अमित ठाकरेच्या आजारपणाच्या काळातही मिताली अमित आणि ठाकरे कुटुंबीयांसोबत अमेरिकेला होती.

11 डिसेंबर 2017 ला मुंबईत अमित आणि मितालीचा साखरपूडा पार पडला होता. आता ठाकरे कुटुंबामध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. मुंबईच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ४०० . व्हीव्हीआयपी मंडळी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.