Rain in Maharashtra: पुणे शहरात आज (22 मार्च) पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेस पर्जन्यवृष्टी (Rainfall in Pune) झाली. पावसाचा आजचा सलग दुसरा दिवस आहे. पावसाने पुण्यात कालही (21 मार्च) हजेरी लावली होती. साधारण 21 मार्च ते 23 मार्च या काळात म्हणजेच पुढील तीन दिवस पुण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने या आधीच वर्तवला होता. हा अंदाज कालपासून खरा ठरताना दिसत आहे. काल दुपारपासूनच पुण्यात ढगांची दाटी पाहायला मिळात होती आणि सायंकाळी तर पाऊसच आला.
पुणे शहरात काल आणि आज अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिक, दुकानदार आणि ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. दुसऱ्या बाजूला हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागल्यने शहरात सकाळपासूनच उकाडा वाढला होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसाने बऱ्यापैकी दिलासा मिळाला. (हेही वाचा, Maharashtra Rains Update: मराठवाड्यात अवकाळी पाऊस, राज्यात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता)
पुण्यात कोणकोणत्या ठिकाणी पडला पाऊस?
- औंध
- बाणेर
- पाषाण
- नगररोड
- बुधवारपेठ
- सिंहगड रस्ता
- सातारा रस्ता
- कोंढवे धावडे
शहरातील काही ठिकाणी रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला. यात नगररोड , शनिवारवाडा, सिंहगड रस्ता , सातारा रस्ता,सहकारनगर, पद्मावती, पर्वती दर्शन, स्वारगेट, महर्षी नगर, मुकुंद नगर आदी परिसराचा समावेश आहे.
दरम्यान, रामटेकडी , केशवनगर मुंढवा , जुनी सांगवी , बिबवेवाडी ,बालेवाडी परिसरात, वाघोली, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात तुरळक पाऊस पाहायला मिळाला. बहुतांश ठिकाणी मेघगर्जना कायम होती.
सध्या पावासाचा हंगाम नाही. परंतू, पर्यावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे अनेकदा बेहंगामी पर्जन्यवृष्टी होत असते. ही पर्जन्यवृष्टी शेती, फळपीके, पशुधन आदींना त्रासदायक ठरते. अनेकदा मानवी साथीचे आजारही अशा पावसाुमुळे काही ठिकाणी उद्भवलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे मिळते.