Drowning in Sea | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सलग दोन दिवस मिळालेली सुट्टी आनंदात घालविण्यासाठी रायगड (Raigad) येथील हरिरेश्वर येथे आलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून () मृत्यू झाला आहे. पल्लवी सरोदे असे या महिलेचे नाव आहे. सदर महिला हरिहरेश्वर समुद्र (Harihareshwar Sea) किनाऱ्यावर पाण्याकडे एकटक पाहात बसली होती. अथांग समुद्रात उसळणाऱ्या लाटा आणि निसर्गाचे सौंदर्य न्यहाळताना ती भान हरपून गेली होती. दरम्यान, एक मोठी लाट समुद्रातून आली आणि त्याच लाटेसोबत सदर महिला पाण्यात वाहून गेली. ही घटना रविवारी (23 मार्च) सकाळी घडली. महिलेस वेळीत मदत पोहोचवून बचाव करण्यात आला. मात्र, तिचे प्राण वाचविण्यात अपयश आले. ही महिला ठाणे जिल्हा कार्यालयात नोकरीस होती.

शेवटचा फेरफटका बेतला जीवावर

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस असलेल्या पल्लवी सरोदे या दोन दिवसांची सुट्टी साजरी करण्यासाठी रायगडला आल्या होत्या. दरम्यान, समुद्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्या हरिहरेश्वर येथे आल्या असता, समुद्रातून आलेल्या लाटेसोबत त्या आत ओढल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अधिक माहित अशी की, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या पीए आणि इतर आठ महिला कर्मचारी दक्षिण रायगड येथे पर्यटनासाठी आणि सुट्टी साजरी करण्यासाठी आल्या होत्या. याच वेळी श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आल्या असता, मंदिर फिरून झाल्यावर त्या पुन्हा एकदा समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी गेल्या. सकाळच्या प्रहरी एक फेरी समुद्रावर मारायची आणि त्यानंतर घरी जाऊन दुसऱ्या दिवशी नोकरीवर परतायचे असा त्यांचा बेत होता. दरम्यान, ही दुर्घटना घडली. (हेही वाचा, Suspicious Boat in Harihareshwar: हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीतून सामान काढण्यास सुरक्षा दलाची सुरूवात)

श्रीवर्धन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

पोल्लवी सरोदे यांना समुद्राच्या लाटेने पाण्यात ओढल्याचे कळताच साळुंखे रेस्क्यू टीमकडून मदत आणि बचावकार्य राबविण्यात आले. त्यांना पाण्यातून बाहेरही काढण्यात आले. पण तोवर होत्याचे नव्हते झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक दिवटे यांनी सदर दुर्घटनेची माहिती श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली. (हेही वाचा, Raigad Suspect Boat Case: रायगड संशयित बोट प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे)

समुद्रकिनारपट्टीवर जाताना काय काळजी घ्याल?

समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत असताना पाण्यात ओढले जाऊ नये किंवा बुडू नये, तशा घटना घडू नयेत आणि टाळल्या जाव्यात यासाठी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:

  • पाण्याच्या खोलीची जाणीव ठेवा: तुम्हाला पोहता येत नसेल किंवा काही शारीरिक समस्या असतील तर खोल पाण्यात टाळा. जरी तुम्ही पट्टीचे पोहणारे असाल तरीसुद्दा उथल पाण्यावरच राण्याचा प्रयत्न करा.
  • लाटांवर लक्ष ठेवा: वरवर पाहता समुद्र जरी शांत वाटत असला तरी तो शांत नसतो. शांत समुद्रातूनच एक मोठी लाट येते आणि किनाऱ्यावरचे सगळेच आत घेऊन जाते. शिवाय समुद्र खवळा असेल तर तुम्ही समुद्राकडे फिरकूच नका.
  • हवामानाची स्थिती विचारात घ्या: समुद्राची भरती आणि ओहोटी यावर लक्ष ठेवा. शक्तीशाली लाटा तुम्हाला पाण्यात ओढून नेऊ शकतात.
  • निसरडे खडक टाळा: किनाऱ्याजवळ ओले किंवा शेवाळाने झाकलेले खडक धोकादायक असू शकतात; कोरड्या, स्थिर जमिनीवर रहा.
  • मुलांवर लक्ष ठेवा: मुलांसोबत चालत असाल तर त्यांना खोल किंवा खडबडीत पाण्यापासून जवळ आणि दूर ठेवा.
  • केवळ जीवरक्षकांवर अवलंबून राहू नका: जीवरक्षक संरक्षण देत असले तरी, स्वतःची खबरदारी घेणे देखील महत्त्वाचे आहे.

वरील मुद्द्यांसोबतच योग्य पादत्राणे घाला, पाण्याचे शूज किंवा मजबूत सँडल तुम्हाला संतुलन राखण्यास मदत करतात आणि ओल्या जागी घसरण्यापासून रोखतात. ही खबरदारी घेतल्याने सुरक्षित, आनंददायी समुद्रकिनाऱ्याचा अनुभव मिळण्यास मदत होते!