Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
Image Credit:Pixabay.com

Pune Weather Prediction, July 1: भारतीय हवामान विभाग (IMD)ने पुणे जिल्ह्यासाठी रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.व मुसळधार पावसाची शक्यात वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. राज्यात आता मान्सून पूर्ण पणे सक्रिय होताना दिसत आहे. पुणे मधील हवामान विभागाचे प्रमुख घोसाळीकर म्हणाले आहेत आम्ही पुढील 5 दिवस जोरदार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. व पुणे,सातारा आणि कोल्हापूरच्या घाटावर ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केला आहे. सोबतच धरणात पाण्याची पातळी वाद होण्याची शक्यता आहे.मान्सूनचे वारे बळकट होत असताना, पुणे आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये पावसाचा जोर वडण्याची शक्यात आहे. पुण्यात आज, ३० जून २०२४ रोजी तापमान २६.३५ डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.99 °C आणि 27.13 °C दर्शवतो.भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुण्यात यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुणे सोबतच रत्नागिरी आणि रायगडमध्ये सुद्धा आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.