Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यामध्ये भाड्याने राहणार्‍या दोन तरूणींना तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण केल्याचे आणि अर्वोच्च शब्दांत बोलणी सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 2 मार्चच्या रात्री पुण्यात खरडी भागातील रक्षानगर भागात झाला आहे.

घरमालकाच्या तक्रारी वरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मुली स्थानिक भागात तोडके कपडे घालून फिरत असल्याने शेजार्‍यांना त्रास होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच शेजार्‍यांनी घरात घुसून पीजी मध्ये राहणार्‍या मुलींना शिवराळ भाषेत मारहाण केली.

एफआयआर मध्ये दिलेल्या माहितीमध्ये मुलीने नोंदवलेल्या जबाबानुसार एक महिला घरात आली तिने मुलींना स्लीपरने मारले. त्यांनी घर उद्द्वस्त करण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी आरोपींना कलम 448, 323, 504, 506, 143,147, आणि  149 अंंतर्गत ताब्यात घेतले आहे. हे देखील नक्की वाचा: Pune: एक व्यक्ती दारुच्या नशेत लावायच्या पोलिसांना फोन, पत्त्याचा शोध घेत पुणे पोलिसांकडून अटक .

अंतर्गत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी यांच्यामध्ये यापूर्वी देखील भांडणं झाल्याची माहिती दिली आहे. सध्या 'कमी कपड्यांवरून' भांडणं झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.