प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- फेसबुक )

पुण्यातील (Pune) चाकण (Chakan) परिसरातील तळेगाव-चाकण चौकात वाहतुक पोलिसांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर येत आहे. रवींद्र करवंदे (वय 30) असे हल्ला झालेल्या पोलिसांचे नाव असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांंनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीतून आरोपींनी दुचाकीवरुन येत पोलिसांवर हल्ला केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (ठाणे येथे 20 वर्षीय व्यक्तीकडून दोन पोलिसांवर हल्ला, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल)

शनिवारी (30 जानेवारी) दुपारच्या वेळेस ही घटना घडली. तळेगाव-चाकण प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने ड्युटीवर असलेल्या रवींद्र करवंदे यांनी आरोपीला कंटेनर मागे घेण्यास सांगितले. त्यावरुन आरोपी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. याचा राग मनात धरुन आरोपीने दुचाकीवरुन येत करवंदे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ते जागीच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णलायात नेण्यात आलं. (चार दारुड्या तरुणींचा पोलिसांवर हल्ला; कॅमेऱ्यात घटना कैद)

रोहित साळवी (20) आणि हर्षदीप कांबळे (22) अशी आरोपींची नावे असून ते मुंबईचे रहिवासी आहेत. या दोघांनीही गुन्हे शाखा युनिट-3 ने अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. (Lockdown मध्ये बाहेर फिरताना रोखल्याने तिघांनी मिळून पोलिसांवरच केला हल्ला; पिंपरी- चिंचवड मधील धक्कादायक प्रकार)

पोलिसांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी यासारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले होते.