| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश वाढवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र काम केले जात आहे. तसेच पोलीस ही रस्त्यावर गस्त घालून नागरिकांना घराबाहेर थांबण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काही ठिकाणी लॉकडाउनचे नियम मोडल्याने पोलिसांकडून चोप देण्यासोबत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात क्वारंटाइन आणि लॉकडाउनचे आदेश मोडल्याने हजारोंच्या संख्यने गुन्हे पोलिसात दाखल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ठाणे (Thane) येथील एका 20 वर्षीय व्यक्तीकडून दोन पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले केल्यास राज्य सरकार कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. तर देवरीपाडा येथे महिलांशी भांडण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अडवले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शाबाज असे आरोपीचे नाव असून त्याने पोलिसांकडील फायबरची काठी हिसकावून घेत त्यांच्यावर हल्ला केला.(मुंबई: धारावी येथे गुन्हे शाखेकडून धाड टाकत तब्बल 12,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 81 हजार त्रिस्तरीय सर्जिकल मास्क जप्त, एकाला अटक) 

दरम्यान, आरोपीच्या विरोधात भारतीय दंडसहिंता कलम 188 आणि साथीचे रोग कायदा लॉकडाउनच्या काळात मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सु्द्धा घराबाहेर फिरणऱ्या व्यक्तींना पोलिसांनी घरात थांबण्याचे सांगितले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला होता.