Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 हजाराच्या पार गेला आहे. राज्य सरकारने लॉकडाउन सुद्धा वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीही सरकार आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र काही समाजकंटकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार केला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यात आता अजून एक भर पडली असून गुन्हे शाखेने मुंबईतील धारावी येथे धाड टाकत तब्बल 12,15,000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 81 हजार त्रिस्तरीय सर्जिकल मास्क जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला सुद्धा अटक करण्यात आली आहे.

मुंबईत आज नवे 183 रुग्ण आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत 1936 कोरोनाबाधित रुग्ण आणि 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 181 जणांचा आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 30 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण आणि 3 पेक्षा अधिक जणांचा मृत्य झाला आहे. धारावी परिसर हा पूर्णपणे सील करण्यात आला असला तरीही आता गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये धारावीतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याने अनधिकृतपणे त्रिस्तरीय सर्जिकल मास्क बाळगले होते.(Coronavirus: ओला कंपनीची आता मुंबई महापालिका सोबत भागीदारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदत करणार) 

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 117 रुग्णांची वाढ झाल्याने आकडा 2801 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबईतील 66 रुग्ण, पुणे येथील 44 रुग्ण आढळले आहेत. या दोन शहरांसोबत अन्य राज्यातील जिल्ह्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासोबत संबंध देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णंची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.