Pune: स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद पण डग्गूला भेटण्यासाठी येणाऱ्या आत्याचा अपघातात मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Pune: पुणे येथे गेल्या काही दिवसांपूर्वी चार वर्षाचा मुलगा स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) उर्फ डग्गू हा अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे घरातील मंडळी चिंतेत होतीच पण पोलिसांकडून ही त्याचा शोध घेतला जात होता. अखेर नुकताच अपहरण झालेला डग्गू पुन्हा आपल्या पालकांना भेटला आहे. या प्रकरणी परिवाराने आनंद व्यक्त केला आहे. पण स्वर्णव याला भेटण्यासाठी येणाऱ्या आत्याचा मात्र रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे अपडेट समोर येत आहे.(Palsavade Village: गर्भवती महिला वनरक्षकास लाथाबुक्क्यांनी मारहाण, सातारा जिल्ह्यातील पळसावडे गावच्या माजी सरपंचाचे कृत्य)

नांदेड येथून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या सुनीता राठोड (आत्या) यांचा नगर महामार्गावर अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा परसली आहे. सुनीता यांच्यासोबत येणाऱ्या समर आणि अमन यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर पती संतोष राठोड हे सुद्धा अपघातातून बचावले असून त्यांना ही दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.(पुणे: चार वर्षांचा अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण आज 8 दिवसांनी सुखरूप सापडला; चिमुकल्याच्या वडिलांची पोस्ट सोशल मीडीयात झाली होती वायरल)

जखमींना बारणेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यात बालेवाडी भागातून दिवसा ढवळ्या एका मुलाचं अपहरण होणं ही पोलिसांसाठी देखील धक्कादायक बाब होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सार्‍यांना कामाला लावलं होतं. सोशल मीडीयातही लोकांनी स्वर्णस्वच्या वडिलांची पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली होती.