पुणे: चार वर्षांचा अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण आज 8 दिवसांनी सुखरूप सापडला; चिमुकल्याच्या वडिलांची पोस्ट सोशल मीडीयात झाली होती वायरल
स्वर्णव चव्हाण । PC: Twitter/ Murlidhar Mohol

पुण्यात 8 दिवसांपूर्वी अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) हा 4 दिवसांचा चिमुकला सुरक्षित सापडला आहे. पुणे पोलिसांच्या शोध कार्याला हे एका महत्त्वाचं यश आलं आहे. दरम्यान स्वर्णस्व च्या वडिलांनी एक सोशल मीडीयात पोस्ट करत त्याची माहिती मिळाल्यास कळवा अशी भावनिक साद घातली होती. स्वर्णस्व सापडला असला तरीही अद्याप त्याच्या अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलिसांचा त्याबाबत तपास सुरू असून संबंधित तपशील लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात बालेवाडी भागातून दिवसा ढवळ्या एका मुलाचं अपहरण होणं ही पोलिसांसाठी देखील धक्कादायक बाब होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सार्‍यांना कामाला लावलं होतं. सोशल मीडीयातही लोकांनी स्वर्णस्वच्या वडिलांची पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली होती. आज आठ दिवसांनी अखेर हा 4 वर्षीय चिमुकला पुनावळे भागात सापडला आहे. स्वर्णवचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. 11 जानेवारीला सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्याचे डे केअरला नेताना अपहरण करण्यात आले होते. हे देखील नक्की वाचा: कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: गावित बहिणींची फाशीची शिक्षा टळली मरेपर्यंत जन्मठेप - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.

पुणे पोलिसांची पोस्ट

पुण्याच्या महापौरांंची पोस्ट  

स्वर्णस्वच्या बॅगेत एका चिठ्ठीमध्ये त्याच्या वडिलांचा नंबर होता. एका सुरक्षा रक्षकाने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.