महिला वनसंरक्षकास माजी सरपंचचाची लाथाबुक्क्यांनी मारहाण | (Photo Credit: Credit - ANI/Twitter)

मजूर स्थानांतर केल्याच्या कारणावरुन महिला वनरक्षक (Forest Ranger) सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील मान (Man Tehsil) तालुक्यात पळसवडे (Palsavade) गावत घडली आहे. महिला वनरक्षक तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे. गावचे वन समितीचे अध्यक्ष व पळसवडे गावचे माजी सरपंच (Sarpanch) रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केल्याचे समजते. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घडल्या प्रकारबाबत सातारा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती पीडित महिला कर्मचाऱ्याने दिली आहे.

वन मजूर इतर ठिकाणी स्थानांतरीत करण्याच्या वादातून हे कृत्य झाल्याचे समजते. तक्रारदार गर्भवती महिला वनरक्षकास सिंधू सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला न विचारता वन मजूर इतर ठिकाणी का नेले असा जाब विचारत चिडलेल्या जानकर यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर सानप यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनुसार सातारा पोलीसांनी माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या बेपत्ता असून, आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. (हेही वाचा, Pune: गरोदर महिलेस डॉक्टरांकडून अमानुष मारहाण; नामांकित रुग्णालयातील धक्कादायक प्रकार)

ट्विट

सिंधू सानप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जानकर हे त्यांच्याकडे पैशाची मागणी करत असत. त्यांना सातत्याने धमक्याही देत असत. तरीही पैसे न दिल्याच्या रागातून जानकर यांनी मारहाणीचे कृत्य केल्याचा सानप यांचा दावा आहे.दरम्यान, सिंधू सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे वनरक्षक असून त्यांनाही जानकर दाम्पत्याने मारहाण केल्याचा त्यांचा दावा आहे.