Pune Shocker: वडिलांसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कथित दाव्यामध्ये बहिण-भावाच्या जोडीने केला महिलेचा खून
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्यामध्ये (Pune) दोन भावंडांनी एका 52 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) या हत्येप्रकरणी बहिण-भावंडांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे. या भावंडांच्या वडिलांसोबत त्या महिलेचे प्रेम संबंध असल्याचा कथित दावा करण्यात आला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, ऋषिकेष फडतरे (34) आणि त्याची बहिण अनुजा (33) अशी आरोपींची नावं आहेत. हे दोघेही बारामतीचे रहिवासी होते. मृत महिलेचे नाव स्वाती आगवान आहे. स्वातीच्या खूनाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे.स्वाती ही बारामतीच्या कसबा भागातील रहिवासी होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबरच्या रात्री या भावंडांनी त्यांच्या वडिलांना महिलेसोबत पाहिले. त्यांची स्वाती सोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रूपांतरण पुढे भांडणामध्ये झालं. त्यांनी वडिलांसोबत स्वातीला देखील काठीने मारहाण केली. यामध्ये स्वातीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने स्वातीच्या नाकातील रक्त पाहून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करत तिची अ‍ॅटोप्सी करण्याचा सल्ला दिला होता. तर वडिलांनाही जबर दुखापत झाली आहे. नक्की वाचा: Mumbai: विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या; सूनेसह प्रियकराला अटक.

स्वातीच्या मुलांनी डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण विचारले होते त्यावेळेस त्यांना पोस्ट मार्टमचा अहवाल येईपर्यंत थांबण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोस्ट करण्यापूर्वीच आरोपींनी पीडितेवर अंतिम संस्कार उरकून घेतले. सध्या या प्रकरणातील फारच कमी गोष्टी हातात असल्याने सखोल चौकशी करणं कठीण बनत चालले आहे. आरोपींच्या वडिलांनी घडलेला सारा प्रकार डॉक्टरांना सांगितला आहे. डॉक्टरांनी चौकशी दरम्यान सारा प्रकार पोलिसांना सांगितला आहे. सध्या आरोपी भावंडं पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे.