
Pune Shocker News: पुणे (Pune) शहरात वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण पाहून शहरात नागरिकांना नेहमीच सुरक्षतेचा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान एका तरुणाने चक्क झोपमोड केल्यामुळे भाडेकरुनी घरमालकाची हत्या (Murder) केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील उरुळी देवाची भागात ही घटना घडली आहे. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने थेट घरमालकाची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष राजेंद्र धोत्रे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दादा ज्ञानदेव घुले असं हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे. हडपसर येथे दादा यांची चाळीत दोन खोली होती. एका खोलीत संतोष राहायचा. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर बाईकचा जोरजोरात हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून मारहाण केली. घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रात्र झाली तरी घुले घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबीयांना बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी चौकशीतून घुले आणि धोत्रे यांच्यात भांडण झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची लोणी काळभोर पोलिस तपास करत आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.