Thane Crime News: ठाण्यात टोळक्यांची हॉटेलमध्ये तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, मालकावर चाकूने हल्ला

ठाण्यात एका हॉटेल मालकावर दोन गुड्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Thane Crime News: ठाण्यात टोळक्यांची हॉटेलमध्ये तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, मालकावर चाकूने हल्ला
Thane Crime News

Thane Crime News: ठाण्यात एका हॉटेल मालकावर दोन गुड्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन गुड्यांनी त्यांच्या मित्रासह हॉटेल मालक आणि कर्मचाकी यांच्यावर हल्ला केला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ठाणे पश्चिमेतील ब्रम्हांड येथील आझाद नगर येथील हॉटेल हिल टॉप येथे ही घटना उघडकीस आली. आरोपींनी हॉटेलची तोडफोड केली. ही घटना रात्री 11 ते 11.30च्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभी पाटील आणि ओंकार भोसले असं आरोपींचे नाव आहे. हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेले असताना काही वेळानंतर मित्रांसोबत आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हल्ला केला. एकाने धारदार शस्त्राने मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. घटनेत मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनास्थळावरून तिघेजण फरार आहे. पोलिस घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. आरोपी फरार असल्याने पोलिसांनी पथके तयार करण्यात आली आहे.

या घटनेनंतर हॉटेल हिल टॉप परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल  केला आहे. आरोपींनी हॉटेलच्या खाण्यावरून भांडण केल्याचा उघडकिस आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2023 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).